ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावलं ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समिती !

0
215

नंदुरबार :२६/३/२३

वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना आपल्या घरातली तरुण मंडळी वृद्धाश्रमाची वाट दाखवतात ..

त्यामुळे त्यांचं उर्वरित आयुष्य सुखात जावं त्यांना दोन वेळचे भोजन मिळावं यासाठी या सेवा समितीने पुढाकार घेतलाय


नंदुरबार शहरातील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकास वृद्ध माता-पित्यास दोन वेळच्या जेवणासाठी उपाशी राहता कामा नये

या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक अन्नपूर्णा सेवा समिती गठित करण्यात आली आहे..

या मागची संकल्पना आहे जयप्रकाश अग्रवाल यांच्यासह सुरेश शंकरलाल अग्रवाल यांची आणि त्यांच्या बारकू पाटील ,आत्माराम इंदवे या सहकाऱ्यांची ..

या संकल्पनेचा खरोखर कौतुक करण्यासारखा आहे…

या जेष्ठ मातापित्यांना आस्था पूर्वक आईच्या प्रेमाची चव असलेली विनामूल्य घरपोच टिफिन सेवा देण्यात येणार आहे…

आर्थिक दृष्ट्या देणगीदारांचे सहकार्य लाभल्यास ही सेवा कायम आणि सातत्याने देण्यात येईल असं देखील आयोजकांनी म्हटलं..
या योजनेचा लाभ केवळ निराधार निराश्रीत अशा योग्य लाभार्थ्यांनाच व्हावा म्हणून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत…

गरजू जेष्ठ नागरिकास विनामूल्य अन्नसुरक्षा प्रदान करणे हे यामागील उद्दिष्ट आहे..

ज्येष्ठ नागरिकांच्या अन्न अर्थात भोजनाची काळजी घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ही समिती गठीत करून ही योजना कार्यान्वित करणार आहे

त्यामुळे या समितीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं तेवढं कमीच..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

या उपक्रमाला आणि या समितीच्या प्रयत्नांना पुढे यश मिळो आणि ज्येष्ठ मातापित्यांना मदतीचा हात आणि आधार मिळो हीच अपेक्षा..
प्रवीण चव्हाण ,नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here