बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…!

0
714

पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांड ताजे असतानाच पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. ही तरुणी एमपीएसची विद्यार्थिनी असून एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गेल्या काही दिवसांपासून मुलींवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांड अद्याप ताजे असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. ही तरुणी एमपीएसची विद्यार्थिनी असून एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील ही घटना असून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दर्शना पवारच्या हत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणीवर हल्ला झाल्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांनी पालक देखील मोठ्या चिंतेत पडले आहेत.

हे सुध्दा वाचा

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

पुण्यातील सादाशिव पेठेतील या घटनेमुळे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या बऱ्याच दिवसांपासून पीडित तरुणीला त्रास देत होता. या विषयीची सर्व कल्पना तरुणाच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. तरुणालाही समजावून सांगण्यात आले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आरोपीने मुलीला फोनवरुन धमकी दिली होती. आरोपीला पीडित तरुणीच्या आईने समजावून सांगितलेले की, माझ्या मुलीला तुझ्यासोबत मैत्री करण्याची इच्छा नाही, तू जर तिला त्रास दिला तर मी पोलीस तक्रार करेल. याच रागातून आरोपीने तरुणीला रस्त्यात एकट गाठून तिच्यावर कोयत्याने वार केला. ज्यावेळी आरोपीने तरुणीवर हल्ला केला त्यावेळी त्याच्या सोबत त्याचा एक मित्र सुद्धा होता. आरोपी तरुण तरुणीमागे कोयता घेऊन तिला मारण्यासाठी पळत होता तेव्हा लेशपाल जवळे या तरुणाने आरोपीच्या हातातील कोयता धरत तरुणीचा जीव वाचवला.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here