.. दिल्ली ,पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले..

0
198

मुंबई :२५/२/२०२३

नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली..
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

2 1

या सदिच्छा भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं.

बाळासाहेब ठाकरे हे वाघच होते उद्धव ठाकरे हे त्यांचे सुपुत्र आहेत त्यामुळे ते देखील वाघच आहेत असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

4

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना न्याय देईल अशी अपेक्षा आहे असे त्यांनी नमूद केलं.

तर कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचं काम ज्या पद्धतीने झालं ते कौतुकास्पद होतं असं देखील त्यांनी म्हटलं.

आज लोकांना नोकऱ्या नाहीत युवक बेरोजगार आहेत एलआयसी सारखी कंपनी तोट्यात जात आहे.

3 1

देशातील काही उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी केंद्र सरकार देशाला विकायला निघालंय असा टोला केंद्र सरकारला केजरीवालांनी लगावला.

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार का यावर दोन्ही उभय नेत्यांनी सूचक विधान केलं.

1 2

अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं..

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ,आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा होते.

6

2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती.

हे नाते आम्ही पुढे नेऊ.

उद्धवजी हे सिंहाचे पुत्र आहेत.

उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, अशी आशा आहे.

5

देशातील अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.

हे नाते आम्ही पुढे नेऊ, असे केजरीवाल म्हणाले. केंद्रावर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, भाजप फक्त गुंडगिरी करतो.

ईडी आणि सीबीआयचा वापर भ्याड लोक करतात. दिल्लीच्या जनतेने आम्हाला एमसीडीमध्ये बहुमत दिले. स्थायी समितीत आमचे बहुमत आहे.

या देशात पक्ष फक्त निवडणुकीचा विचार करतो.

यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी कशी मजबूत करता येईल यावर चर्चा झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे मार्चच्या अखेरीस उद्धव ठाकरे मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची मोठी बैठक आयोजित करण्याच्या तयारीत आहेत.


या बातमीसाठी मुंबईहून एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here