ग्रामसेविकेचं मनमानी कारभार ..

0
505

धडगाव /नंदुरबार -१६/४/२३

धडगांव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खुटवडा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला सगळेच कंटाळलेत ..
कंटाळुन अखेर सरपंच, उपसरपंच, सदस्य,व गावातील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समीती धडगांव तालुका अक्राणी जि.नंदुरबार कार्यालय गाठलं ..
खुटवडा येथिल कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी ह्या ग्रामपंचायत च्या प्रमुख असलेल्या सरपंचं व उपसरपंचं व सदस्य यांच्या मासिक सभा असो की ग्रामसभा कुठलीही विकास काम ऐकुन घेत नाही.स्वतःचा मनमानी कारभार रेटतात ..

खुटवडा हे गांव अतिदुर्गम भागात असल्यामुळे ग्रामस्थांना खाजगी वाहनातुन प्रवास भाडे देवुन शैक्षणिक दाखले व तत्सम कामासाठी धडगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयात येत असतात.
पण एकीकडे ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजर नसतात.
कोणत्याही शैक्षणिक कामासाठी लागणा-या दाखल्यांवर सही घेण्यासाठी ग्रामस्थांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
ग्रामविकास अधिकारी ला मोबाईल फोन द्वारे संपर्क केले असता.मोबाईल नेहमीॅ आउट ऑफ कव्हरेज दिसतो ..
त्यांचे पती हे कार्यालयात ठाण मांडून बसलेले दिसतात ..

dhadgv.jpg1
1
dhadgv.jpg2
2

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0
प्रश्न पडतो कि कारभारणीचा कारभार नेमका चालवतो तरी कोण ? ग्रामसेविका या नाममात्र उरल्या ?
सदर प्रकाराबद्धल विचारपुस केली असता उडवा- उडवीची व असामाधान कारक उत्तरे ग्रामस्थांना मीळत असतात.
ग्रामस्थांनी पाच वर्षात विविध विकास कामांसाठी जनतेच्या विश्वासातुन गावाचे प्रमुख म्हणुन सरपंचाला निवडुन आणतात.पण सरपंचा ची या ग्रामविकास अधिकारी शुन्य ही ऐकेना! कुणा राजकीय पुढा-यांच्या आर्शिवादाने खुटवडा ग्रामपंचायत चे ग्रामवीकास अधिका-यांचे मनमानी कारोभार तर चालतं नाही ना ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.
सर्वसामान्य ग्रामस्थांची वेळेवर काम न करणा-या ग्रामविकास अधिकारीची तत्काळ बदली करुन नविन ग्रामविकास अधिकारीची नेमणुक करावी असे निवेदनात नमुद करण्यात आले.
यावेळी मीना संभाजी पावरा, (सरपंच ग्रा.प. खुटवडा),शेवंती माक्या पावरा, (ग्रा.प.उप सरपंच),वसंत जामसिंग पावरा, ग्रा.प.सदस्य,जिंगा आट्या पावरा ग्रा.प. सदस्य,विध्या दारासिंग पावरा ग्रा.प. सदस्य,शिवाजी पावरा, खात्र्या पावरा,दारासिंग पावरा,रायसिंग पावरा,मोचडा पावरा.शंकर पावरा, तुकाराम पावरा कीसन पावरा , संभाजी पावरा आदि ग्रामस्थ निवेदन देतेवेळी उपस्थित होते..

गोपाल पावरा ,प्रतिनिधी धडगाव ,एम डी टी व्ही न्यूज ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here