विठ्ठल नामाची शाळा भरली..

0
456

भडगाव /जळगांव -२८/६/२३

चिमुकल्या वारकर्यांची गावातुन निघाली वारी. रंगला रिंगण सोहळा…

रा. स. शि. प्र. मंडळ चाळीसगाव संचलीत गोंडगाव ता. भडगाव येथील माध्यमिक विदयालयात आषाढी एकादशी निमित्त गावातुन चिमुकल्या वारकरी विदयार्थ्यांची टाळ, विणा, मृदुंगाच्या गजरात व भगवंताच्या जयघोषात वारी काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या जयघोषाने परीसर दुमदुमला होता. चिमुकल्या विदयार्थ्यांचा पोषाख, हाती भगवे झेंडे, तुलसीधारक विदयार्थीनी वारीत आकर्षण ठरले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, विठ्ठल नामाची शाळा भरली.

या गीतांमुळे भक्तीमय वातावरण दिसुन आले. विदयालयाच्या प्रांगणात चिमुकल्या विदयार्थ्यांचा टाळ, मृदुंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या जयघोषाने रिंगणसोहळा रंगला. मोठया उत्साहात हा सोहळा पार पडला.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक ओ. पी. जाधव,सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, पी. व्हि. जाधव, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, . जे. जी. भोसले, पी. व्हि. सोळंके, एस. एस. आम्ले, एल. एस. पाटील, बी. आर. साळुंखे, आर. बी. महाले आदि शिक्षक, लिपीक पी. जे. देशमुख, ग्रंथपाल एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सोहळयात विदयार्थी, विदयार्थीनींनी सहभाग घेतला. यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.या कार्यक्रमास नागरीकांचीही उपस्थिती होती.

सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here