नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउभरचा जांभीपाडा येथे दुकानाच्या जागेच्या वादातून एकास काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तिन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील साकलीउभर जांभीपाडा येथील सामा पांड्या पावरा यांना दुकानाच्या जागेच्या कारणावरुन आमश्या सायसिंग पावरा, हान्या सायसिंग पावरा व अनिल राज्या पावरा यांनी काठीने व हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली.
शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली असून सामा पावरा यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात वरील तिघांविरोधात भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.चेतन साळवे करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.