शिंदखेडा :- येथील दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अमोल भगवान शिंपी यांचे भाचे दुर्गेश सूर्यकांत शिरसाठ यांना नुकतेच जर्मनी येथे एर्लागंन न्यूर्नबर्ग शहरातील फेडरिक अलेक्झांडर युनिव्हर्सिटी येथे दोन वर्षासाठी मास्टर ऑफ सायन्स इलेक्ट्रो मोबिलिटी या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. दुर्गेश यांचे वडील सध्या मुंबईत रिक्षा चालक असून त्यावर आपली उपजविका चालवत असून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
रिक्षचालकाचा मुलगा शिक्षणासाठी जर्मनी गेल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. दुर्गेशचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे झाले. शिक्षणाची आवड असणाऱ्या दुर्गेशला पुढील शिक्षणासाठी जर्मनी पाठविण्यासाठी त्याच्या आई वडिलांना आर्थिक अडचण होती. परंतु शासनातर्फे स्कॉलरशिप मिळाल्यामुळे त्यास जर्मनी पाठविणे सोयीस्कर झाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
स्कॉलरशिप मिळाल्यामुळे आता त्यांना फक्त तेरा हजार रुपये प्रति सेमीस्टर ऐवढा खर्च येणार असल्याचे त्याच्या आई वडिलांनी सांगितले. दुर्गेशच्या विदेशवारीने शिंदखेडा येथील त्याचे मामा अमोल शिंपी व त्यांचा परिवार तसेच संपूर्ण शिंपी समाज व मित्र परिवारातर्फे दुर्गेशच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यादवराव सावंत. एम.डी.टी.व्ही. न्युज, शिंदखेडा.


