वीज तारांवरील झाडांच्या फांद्या काढून संभाव्य दुर्घटना टाळा

0
185

तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उपभियंत्याकडे निवेदनाव्दारे केली मागणी

तळोदा :- पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी उपाययोजनांबाबत महावितरणकडून कोणतीच कार्यवाई अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहरातील तसेच महत्वाच्या व वर्दळीच्या रस्त्यांवरील विद्युत तारा झाडांच्या फांद्यात गुरफटल्याचे फोटो सादर करुन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याबाबत वीज वितरणचे उपअभियंता तिरुपती पाटील यांना निवेदन दिले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

निवेदनात म्हटले आहे की, मान्सून सुरू होण्यापूर्वी दरवर्षी वीज तारांमध्ये अडकत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात येतात. तसेच अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतात. वादळी पावसामध्ये वीज तारांमध्ये झाडांच्या फांद्या अडकून तारा तुटल्यास वीज पुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी महावितरणकडून मोहीम हाती घेण्यात येते.

हे सुध्दा वाचा:

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

BIG BREAKING… मान्सूनचा प्रवासात चक्रीवादळाचा खोडा ! – MDTV NEWS

साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS

परंतु सध्या ही मोहीम अतिशय संथगतीने तळोदा शहरामध्ये सुरू आहे. त्यामुळे तळोदा शहरासह ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश ठिकाणी रस्त्यावर वीज तारांना झाडांचा विळखा पडल्याचे चित्र दिसत आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होण्याचा धोकाही वाढला आहे. महावितरणने चिनोदा रोड संपूर्ण परिसर, विजय किराणा, चर्मकार हट्टी जवळीत खांब जीर्ण अवस्थेत आहेत. तापिमाई नगर परिसर, टेलिफोन एक्चेंज जवळ (साईबाबा नगर), बँक ऑफ बडोदा, मारुती गल्लीत खांब सरळ करणे तसेंच लोंबकळलेले वीज तारा खेचून होणारी संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, सामाजिक कार्यकर्ता संदीप परदेशी, सरचिटणीस महेंद्र पोटे, सहसंघटक मुकेश पाडवी, शहर उपाध्यक्ष नदीम बागवान, अनिल पवार, युवक उपाध्यक्ष देवेश मगरे, नईम बागवान, मोसीन खाटीक, प्रकाश पाडवी उपस्थित होते. येत्या चार दिवसात शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज संदर्भातील सर्वच समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन उपअभियंता तिरुपती पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

नितीन गरुड. एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, तळोदा ग्रामीण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here