शिरपूरात निघाली भा. ज.पाची सावरकर गौरव रथ यात्रा..

0
134

शिरपूर /धुळे -३/४/२०२३

भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा काढण्यात आली..

ती यात्रा शिरपूर शहरात काढली होती ..

भा ज पा आणि शिवसेना या दोन पक्षांनी आयोजन केलं ..

महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली यात्रा काढली ..

शिरपूर शहर व तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

घोडा बग्गीमध्ये वीर सावरकर प्रतिमा ठेवण्यात आली होती .. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट सादर करण्यात आला…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आ. अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्त्वाखाली सावरकर गौरव गीते, देशभक्तीपर गीते, पारंपारिक वाद्य यांच्या वातावरण निर्मितीत स्वातंत्र्यविर सावरकर गौरव रथ यात्रा शहरातील चोपडा जीन पासून मेन रोड, एस. टी. स्टँड समोरुन विजय स्तंभ, भाजपा कार्यालया पर्यंत समोर समारोप करण्यात आला.

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून यात्रा काढण्यात आली ..

गौरव यात्रेत सर्वांनी “मी सावरकर टोपी” घालून व “मी सावरकर” पट्टा टाकून “मी सावरकर” घोषणा देत यात्रेला सुरुवात केली.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी या यात्रेवेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं .

तर यावेळी सुभाष कुलकर्णी यांनी देखील विचार मांडलेत .

यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, सुभाष कुलकर्णी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, महिला पदाधिकारी, शिवसेनेचे मनोज धनगर, भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी, तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी बंदोबस्त साठी उपस्थित होते.
नवल कढरे – एम डी टी व्ही न्युज शिरपूर तालुका प्रतिनिधी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here