तळोदा : “बम बम भोले” चा गाजर करीत तळोद्याचे ७० भाविक उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेसाठी मंगळवारी रवाना झाले. यावेळी शहरातील शिव भक्तांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
चारधाम यात्रा करणे हे देखील भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाते. भारतात १२ ज्योर्तिलिंगांना विशेष महत्त्व असलेल्या चार धाम यात्रा पैकी एक असलेले पवित्र केदारनाथ यात्रेचे द्वार एप्रिल महिन्या पासून उघडण्यात आले आहे. उत्तराखंडातील कठीण समजल्या जाणार्या बद्रीनाथ – केदारनाथ – गंगोत्री – यमुनोत्री यात्रेसाठी जय भोलेचा गजर करत तळोदा शहरातून ५० यात्रेकरूं रवाना झाले आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
भावाचा खुनाचा असा घेतला त्यांनी बदला … चौघांना पोलिसांनी केली अटक – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS
नंदुरबार येथे भाजपचे शहर अध्यक्ष योगेश चौधरी, शहादा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी यांनी यात्रेकरूंची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यासह यात्रेत जाणाऱ्या भाविकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून ५ हजार रुपयाची रोख मदत केली. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक गौरव वाणी, शिंदे गटाचे शहर अध्यक्ष जगदीश परदेशी, सुरत येथील डॉ.विपुल पटेल यांनी सुरत येथे यात्रेकरूंना भेट देवून यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांची जेवणाची, प्रवासात लागणाऱ्या पाण्याची व औषधीची सोय करून दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
भावाचा खुनाचा असा घेतला त्यांनी बदला … चौघांना पोलिसांनी केली अटक – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS
यात्रेकरूनी आभार मानले. यात्रेकरू सुभाष शिंदे, महेंद्र गिरासे, आश्विन परदेशी, कौशल सवाई, गोकुळ मिस्त्री, इंद्रसिंग गिरासे, चंद्रकांत जैन,भय्या चौधरी, लक्ष्मण माळी, रामकृष्ण गुरव, सुधीर चौधरी, नरेश चौधरी, सुधाकर मराठे, मंगलसिंग परदेशी, अशोक जाधव, मयूर गोयल, शशिकांत माळी यासह ठाणेदार गल्ली, मराठा चौक असे विविध ठिकाणचे ७० भाविक यावेळी उपस्थित होते.
महेंद्र सूर्यवंशी. एम.डी.टी.व्ही. न्युज तळोदा.