जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
नंदुरबार :- राजपूत भामटा समाजातील भामटा शब्द वगळण्यात येवू नये, रक्तनात्यातील २०१७ ची अधिसूचना रद्द करण्यात यावी, बोगस जात पडताळणी व्हँलिडिटी देणाऱ्यांवर व घेणाऱ्यावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागण्या बंजारा ब्रिगेडने केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमुक्त जाती अ.प्रवर्गातील १४ जाती-जमाती पैकी एक राजपूत भामटा हि एक जमात आहे. ही जमात राजपूत समाजा पासून पुर्णतः वेगळी आहे. राजपूत हा समाज उन्नत व उच्च श्रेणीत येतो आणि त्याचे राजपूत भामटा या जातीशी कुठेही संबंध येत नाही. मागच्या भाजपा.च्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सण. २०१७ च्या रक्तनात्यातील अधिसूचना काढून बोगस लोकांना जातपडताळणी मिळवण्यासाठी एक प्रकारे अभय दिले व मुळ लोकांना सवलती पासून वंचित ठेवण्यासाठी मार्ग मोकळा केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, १४ मे २०२३ रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे महासंमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपुत भामटा मधून भामटा शब्द काढण्यात येणार किंवा काढून टाकु असे घोषित केले. त्यामुळे विमुक्त जाती अ.प्रवर्गातील जाती जमाती वर अन्याय होणार आहे. तसेच त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
भामटा शब्द वगळण्याने संपूर्ण राजपूत समाज आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे कटकारस्थान आले आहे. त्यामुळे भामटा शब्द वगळण्यात येवू नये. यासाठी संपूर्ण बंजारा समाजाचा तिव्र आक्षेप असल्याचे निवेदनात म्हटले आहे. वरिल मागणी बाबत न्याय न मिळाल्यास वि.जा.अ. प्रवर्गातील १४ जाती जमाती मिळुन बंजारा ब्रिगेड नंदुरबार जिल्हाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर नंदुरबार जिल्हाध्यक्ष मिलन हेमंत जाधव यांची सही आहे. यावेळी बंजारा ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
नारायण ढोडरे. एमडीटीव्ही न्युज, नंदुरबार ग्रामीण.