शिरपूर शहरातून बंजारा समाजानं काढली भव्य शोभायात्रा..

0
204

शिरपूर,धुळे :१६/२/२३

क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती शिरपूर शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

शिरपूर शहरातून बंजारा समाजाने भव्य शोभायात्रा काढून शिरपूर वासियांचं लक्ष वेधलं.

हि पहा सविस्तर बातमी –https://youtu.be/CH66yE4K5Yw

सर्वप्रथम पुलवामातील शहिदांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. निवडक बंजारा मुलींनी प्रातिनिधिक मनोगत व व्यक्त केली.. त्यापैकी या छोट्याशा मुलाचं मनोगत कौतुकास पात्र ठरलं.. ऐकूया त्याचं मनोगत.

यावेळी बंजारा मुलींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून बंजारा गीतांवर नृत्य सादर केलं.. पाहूया हा अनोखा डान्स..

रामदेव बाबा मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तिथं त्याचा समारोप करण्यात आला. तर शिरपूर तालुक्यातील बभळाज या गावात आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं.

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही पेन वाटप करण्यात आलं. यावेळी आमदार काशीराम पावरा यांच्यासह थाळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमेश बोरसे, आणि विविध मान्यवर उपस्थित होते. सेवालाल महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

बंजारा महिलांनी घोषणा देत जंगी मिरवणूक काढली.. महिला तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, भरत सिंह राजपूत हे देखील या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध भागातून हजारोंच्या संख्येने बंजारा समाज सहभागी झाला होता.

राज जाधव,शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी ,बभळाज, एम .डी .टी.व्ही न्यूज..शिरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here