बँकेचे प्रबंधकांवर गुन्हा दाखल करा : माजी नगरसेवक दीपक अहिरेंची मागणी ..

0
194

धुळे -२०/५/२३

शिंदखेडा येथील स्टेट बँक व सेंट्रल बँक येथील प्रबंधक यांनी अनुसूचित जाती जमातीच्या नगरसेवक तथा आदिवासी शेतकरी दीपक दशरथ अहिरे यांना पीक कर्ज देण्यास नकार दिला.
कर्जासाठी लागणारे सर्व कागदपत्रे जोडून बँकेच्या सर्व अटी पूर्ण केल्या
तरी शिंदखेडा येथील स्टेट बँक व सेंट्रल बँक यांनी त्यांची फाईल नामंजूर केली

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
कारण त्यांच्या सातबाऱ्यावर वारस जास्त होते परंतु त्यांच्या परिवाराने त्यांना शेतीचे व घराच्या सर्वधिकार दुय्यम निबंधक साहेबांसमोर जनरल मुक्तार पत्राने दीपक दशरथ अहिरे यांना देण्यात आले आहेत.
तरीदेखील स्टेट बँकेचे प्रबंधक अमितकुमार गुप्ता व सेंट्रल बँकेचे प्रबंधक प्रकाश चव्हाण यांनी त्यांना पीक कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला.
कारण आदिवासी लोक कर्ज घेऊन फेडत नाहीत म्हणून आमच्या बँका आदिवासीना कर्ज देत नाहीत अशा शब्दात हीन वागणूक देऊन त्यांना अपमानीत केले. एका आदिवासी शेतकऱ्यास त्यांच्या शेतीसाठी हे पीक कर्ज घ्यावयाचे आहे परंतु दोन्ही बँकेचे प्रबंधकांनी त्यांना ते देण्यास नकार दिला आहे.
त्यांच्या अशा या उत्तरांमुळे आदिवासी शेतकरी दीपक अहिरे यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला असुन बँक ही फक्त जात-पात पाहून कर्ज देते काय ? असा प्रश्न निर्माण झालाय?
अशा जातीयवादी प्रबंधकांची चौकशी करून व त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या कार्यालयात दिलेले आहे.
निवेदनावर काहीही कार्यवाही न झाल्यास पुढील आठ दिवसात नगरसेवक दीपक अहिरे हे शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत असा इशाराही त्यांनी प्रशासनास दिला आहे.
यादवराव सावंत ,एम डी टी व्ही न्यूज ,शिंदखेडा प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here