नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज शांततेत मतदान पार पडले असून सायंकाळी ५ आहे पर्यत सुमारे ९७ टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार कृऊबासाठी ९७.८६, नवापूर कृऊबासाठी ९७.५६ तर शहादा कृऊबासाठी ९६.८२ टक्के मतदान झाले. एकूण ३५ मतदान केंद्रावर एकूण ७ हजार २३ मतदारांपैकी ६ हजार ८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. जिल्हा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी आज दि.२८ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजारसाठी समितीसाठी १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात असून याठिकाणी सरळ लढत होत आहे. एकूण १६ मतदान केंद्रांवर आज २ हजार ७२७ मतदारांपैकी २ हजार ६६९ मतदारांनी मतदान केले. एकूण ९७.८७ टक्के मतदान झाले. नंदुरबारसाठी सकाळपासूनच मतदारांनी उत्साह दाखविल्याने सकाळी १० वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. तर १२ वाजेपर्यंत ७६ टक्के, २ वाजेपर्यंत ९२ टक्के व शेवटी ५ वाजेपर्यंत ९७.८७ टक्के मतदान झाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी आज २ हजार ८३७ मतदार असून २ हजार ७४७ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९६.८२ अशी आहे. शहाद्यात सकाळी संथगतीने मतदानाला सुरुवात झाली. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत २ हजार ७४७ मतदारांनी मतदान केंद्र गाठल्याने ९६.८२ टक्के मतदान झाले.
नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. १ हजार ४५९ मतदारांसाठी ७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलीहोती. नावापुरात देखील सकाळी संथगतीने मतदानाला सुरुवात झाले. मात्र १ हजार ४२५ मतदारांनी मतदान केल्याने ९७.६६ टक्के मतदान झाले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार कृऊबासाठी निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, शहादा कृऊबासाठी निवडणूक निर्णय अधिकारी निरज चौधरी तर नवापूर कृउबासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शितल महाले यांनी काम पाहिले. जिल्हा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले असून उद्या मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान मतदार राजा नेमके कोणाच्या बाजूने कौल बजावतो हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार