लाभार्थीची पावले वळली पुन्हा सरपणाकडे ..

0
188

नेर /धुळे :१३/३/२३

गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील उज्ज्वला पुन्हा सरपणाकडे वळल्या आहेत.

महागाईचे चटके बसत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात आणखी पन्नास रुपयांची वाढ झाल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे.

परिणामी गॅस परवडत नसल्याने ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे, त्या घरातून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सरपणाचा धूर निघत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. :
मागील दोन वर्षात गॅस सिलिंडरचे भाव दुपटीने वाढले असून शासनाने अनुदानही बंद केले आहे.

पूर्वी १४.२ किलोग्रॅम गॅस सिलिंडरला १०७८ रुपये मोजावे लागत. आता त्यात ५० रुपयांची दरवाढ होऊन आता त्याच सिलिंडरला १,१२८.५० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागातील कुटुंब गॅस सिलिंडरऐवजी चुलीला पसंती देत आहेत. त्यामुळे, उन्हात सरपण गोळा करणे सुरू झाले आहे.

१ मे २०२० पासून गॅस सबसिडी बंद करण्यात आली आहे. केवळ ९ ते १० रुपये एवढी नाममात्र सबसिडी दिली जात आहे.

दोन वर्षांपासून अनुदानच बंद करण्यात आले असल्याने सबसिडी विचारणा करण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिबांना गॅस सबसिडी पुन्हा मिळावी, अशी मागणी होत आहे.

सध्या गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्यामुळे म्हसदी परिसरातील गृहिणी चुलीकडे वळल्या आहेत.
दिलीप साळुंखे, धुळे तालुका प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

ner dilip salunkhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here