Nandurbar:१०/०२/२०२३
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे नुकतंच जागृत पालक सुदृढ बालक अभियान अभियान राबवण्यात आलं..
नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्या रावल यांच्या हस्ते नुकतंच या अभियानाचे उद्घाटन करण्यात आलं.

आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा डॉक्टर राजेश पाटील डॉक्टर किशोर पाटील आरोग्य अधिकारी यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदस्या ऐश्वर्या राय यांनी योग्य आहार व्यायाम आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी ती किती महत्त्वाची याविषयी मार्गदर्शन केलं. तर किशोरावस्थेत घ्यावयाची काळजी या विषयी वाघ सिस्टर यांनी मार्गदर्शन केलं.

यावेळी माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करून त्यांना औषध उपचार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.
गणेश कुवर, सारंगखेडा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज…