BHADGAON:गोंडगाव जि प शाळेत विविध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न ..

0
754

जळगांव -२३/७/२३

जि प प्राथमीक शाळा गोंडगाव येथे मागील शैक्षणिक वषाॅत NSSE exam उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सन्मान नुकताच करण्यात आला .. गोंडगाव तालुका भडगाव येथील जि, प, शाळेत चार विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय परीक्षेत nsse exam उत्कृष्ट मार्कांनी पास झाले .. अंजली रवींद्र पाटील व मोहित दिलीप पाटील या एकाच कुटुंबातील भाऊ बहिणींनी मेरिटमध्ये आले.. शाळेतील चिमुकल्यांनी आकाश भरारी घेतल्याने शाळेत त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला .. गावातील विद्यार्थ्यांचे पालक विनोद मराठे, दिलीप गपुं साठे, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र बाबूलाल निकम, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक बोरसे, शाळा व्य. स. अध्यक्ष श्री ललितभाऊ मांडोळे, सवॅ शिक्षक बंधू भगिनी , गावातील महिला दूध विकास सो. चे माजी चेअरमन श्री. वासुदेव पाटील पत्रकार सतीश पाटील, निलेश जाधव ,मराठी शाळा विकास मंचाचे सक्रिय सदस्य जितू भैया, राहुल सोनार उपस्थित होते. शिक्षक ज्ञानेश्वर महाजन, नितीन महाजन, विजय पाटील ,नामदेव देवरे ,निर्मला सोळंकी, पुनम पवार, शर्मिला पाटील व तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते.

1
2
3
4

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मुख्याध्यापक दीपक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .. यावेळी चिमुकल्याचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला होता..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पूनम पवार यांनी केले ..
सतीश पाटील ,एम डी टी व्ही न्यूज , भडगाव तालुका प्रतिनिधी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here