भडगाव : महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा रास्ता रोको …

0
135

जळगाव -८/४/२३

भडगाव येथील पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आलाय ..

तसेच भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान राघो हाटकर व भडगाव तालुका कार्यकारणीच्या माध्यमातून कापसाला तेरा हजार रुपये भाव मिळावा तसेच दरवर्षाला पंधरा टक्के वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला
शेतकऱ्यांच्या जीवावरती राजकारण करून आमदार ,खासदार झालेले लोकप्रतिनिधी या सर्वांच्या संगणमताने शासनाने चुकीच्या धोरणाच्या मुळे कापसाचे भाव पाडण्यात आला.

आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे ..

जे आमदार खासदार विधिमंडळात जाऊन मतदारसंघाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम करतात

परंतु ते असं न करता शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा गंभीर प्रश्न कापसाला तेरा हजार रूपये हमी असून यावर आमदार साहेब एक शब्द सुध्दा विधिमंडळात काढत नाही मग आम्हा शेतकऱ्यांना वाटते की आमचे आमदार मुंबईला मूग गिळून गप्प का ?असा प्रश्न उपस्थित होतो

अशा लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र शेतकरी संघटनाच्या माध्यमाने तालुक्यातील,जिल्ह्यातील शेतकरी त्यांना त्याची जागा दाखवतील असे मत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी व्यक्त केले ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

रास्ता रोको आंदोलनाच्या प्रसंगी बोलत होते
यासंदर्भात भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर यांनी शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे गंभीरपणे पाहिले जात नाहीत..

त्यामुळे यापेक्षा आम्ही मोठे आंदोलन उभे करू ..

यावेळी तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील यांनी वडली घटना घडते यासारखा दुर्दैव दुसरे कुठले नाही याबाबत सांगितले ..

भडगाव तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी, संपर्कप्रमुख भगवान चौधरी ,माहिती प्रमुख विलास वासुदेव देशमुख ,खजिनदार मनोज परदेशी यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सतीश पाटील ,भडगाव तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here