भडगाव तालुक्याला चक्रीवादळाचा फटका

0
352

केळी बागांचे मोठे नुकसान ; पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

भडगाव/5/6/23:- तालुक्यातील वडगाव परिसरात दिनांक ४ जून रोजी झालेल्या चक्रीवादळात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. वादळात केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून केळीचे झाडे जमीनदोस्त जाळी आहेत.

शासनाने त्वरित पंचाने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

भडगाव तालुक्याती वडगाव परिसरात काल रविवार नुकसान वार ठरला आहे.

अचानक आलेल्या वादळाने शेतीतील केली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वडगाव येथील शेतकरी लुगडूशेठ माळी यांच्या शेतात दोन एकर शेतात केळी पिकाचे दोनशे –

अडीचशे झाडे जमीनदोस्त झाले आहेत. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वडगाव येथील शेतकरी विजयसिंह मानसिंग पाटील व यांच्या शेतात दोन एकर शेतामध्ये केळीचे पीक लावलेलं होते. वादळात दोनशे ते अडीचशे झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मागील दोन महिन्यापासून गारपीट व अवकाळीचा फटका बसत असून यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

केळी पिक विमा योजनेतून कोळगाव विभाग वगळला गेल्याने शेतकऱ्याना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नुकसानीचा स्पॉट पंचनामा होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत आहे

सतीश पाटील. एम डी.टी व्ही.न्यूज भडगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here