Bhayander:बिल्डिंगचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती..

0
271

पालघर -२०/७ २३

राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलं आहे. त्याचदरम्यान, भाईंदर पूर्व येथे एका बिल्डिंगचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.भाईंदर पूर्व येथे एका बिल्डिंगचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. भाईंदर पूर्व येथे नव कीर्ती इस्टेट, रुपेश बार या बिल्डिंगचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ही बिल्डिंग भाईंदर स्टेशन पूर्वला लागूनच आहे. या बिल्डिंगच्या खाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

1

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

अग्निशमक दलाच्या गाड्या तसेच पोलिसांच्या गाडी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना काढण्याचे काम चालू आहे. अनेकजण ढिगार्‍याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. ज्या ठिकाणाचा भाग कोसळला आहे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असणारे काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ऋषीकेश जाधव,पालघर प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here