सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भव्य भीम गीतगायन कार्यक्रमाने भीमसैनिकांमध्ये भरला जोश..
शिरपूर /धुळे -२४/४/२३
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त नगरसेवक गणेशभाऊ सावळे आयोजित भव्य भीम गीतांच्या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
नगरसेवक गणेशभाऊ सावळे यांच्या आवाहनानुसार शिरपूर तालुक्यातील भीम अनुयायांचा प्रचंड प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला.
बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित अजरामर गीतांनी शिरपूरकरांनी एकच ठेका धरला.
प्रचंड उत्साह व आनंदमयी वातावरणात भीम महोत्सव-२०२३ पार पडला.
नगरसेवक गणेश सावळे आयोजित कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर, कि.वि.प्र. संस्थेचे सचिव निशांत रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पैलवान नानाभाई साळवे, कुणाल सोनवणे, सागर उटवाल, अर्जुन जावळे, श्याम शिंदे, वासुदेव देवरे, शामकांत ईशी, केशव आण्णा सावळे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, विजय खैरनार, मुलचंद शिरसाट, पत्रकार नवल कढरे, प्रेमचंद शिरसाट, युवराज ठोंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
https://bit.ly/3UoK7E0
आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ माता भगिनींनी कडूबाई खरात यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नगरसेवक गणेश सावळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारी अनेक गीते कडूबाई खरात यांनी सादर केली.
या गीताने उपस्थितांची दाद मिळवली ..
माय बापाहुन भीमाच,
उपकार लय हाय र…
तुम्ही खाता त्या भाकरीवर
बाबासाहेबांची सही हाय र.।।
या गीतावर भीम अनुयायी अक्षरशः थिरकले.
साऱ्या जगामध्ये कुठे बी जायं….
माझ्या भिमाचा दरारा हायं….
काखेत पोरगं हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता, आरे, खरकटं भत्ता
फजिती होती माय मोठी
माया भीमानं, भीमानं माय सोन्यानं भरली ओटी.
या गीतांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रमास महिला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तसेच शिरपूर शहरातील व तालुक्यातील सर्वस्तरातील प्रबुद्ध नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
• नवल कढरे, एम डी टी व्ही न्युज, शिरपूर तालुका प्रतिनिधी..