तळोदा /नंदुरबार -7/6/23
शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या 2021 पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं
तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील नवीन 33 11 के व्ही सबस्टेशनच भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडलं
महावितरण कडे 22 मार्च 2021 रोजी ऑनलाईन प्रणाली द्वारे नवीन एकूण आठ नव्या सबस्टेशनच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता
त्यात रेवानगर मोठा धनपूर चांद सेली, रामपूर, गणोर, तऱ्हाड, कळंबू, अनरद यांचा समावेश होता
मुंबई येथील मुख्य कार्यालयात पाठपुरावा करून यात आठ सबस्टेशनची मंजुरी घेतली
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आणि तरुण पिढीला सक्षम हीच पुरवठा मिळावा या दृष्टिकोनातून सबस्टेशन ची मागणी केली होती
धडगाव तालुक्यासाठी सुरवाणी येथे 132 सबस्टेशनच मागील दहा वर्षापासून रखडलेले काम अखेर मार्गे लागले
रेवनगर सब स्टेशन कामाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते नुकताच पार पडलं
यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बळीराम पाडवी, पंचायत समितीचे दाज्या पावरा, सरपंच विक्रम पाडवी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा शहर प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार