नेर /धुळे -३/६/२३
धुळे तालुक्यातील नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी बांधणीसाठी जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते भूमपूजन करण्यात आले.
तसेच नेर गटाचे जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य आनंदराव दत्तात्रय पाटील यांच्या विकास कामांना पुन्हा एकदा जोमाने सुरुवात करण्यात आली आहे.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीण चे लोकप्रिय आमदार कुणाल रोहिदासजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून
नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री.आनंदराव दत्तात्रय पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नेर गटाच्या विकास कामांच्या निधीसाठी अतोनात प्रयत्न करत होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्याच अनुषंगाने नेर गटाचे जि. प.सदस्य श्री.आनंदराव दत्तात्रय पाटील यांनी जिल्हा परिषद अंतर्गत 3054 यातून 15 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात त्यांना यश आले आहे.
यासाठी आज दि.01/06/2023 रोजी 3054 अंतर्गत नेर गावासाठी नेर ते नांद्रे रस्तालगत मोठे लवण पाईप मोरी या कामासाठी 15 लक्ष रुपयांच्या निधीच्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी पं. स. सदस्य मांगु मोरे, ग्रा. पं. सदस्य गणू जयस्वाल ,सामाजिक कार्यकर्ते निंबा बापू खलाने, साहेबराव चेअरमन,प्रकाश खलाने,श्याम साहेब,गोविंद भागवत,मधुकर अहिरे,विश्वास याळीस,दशरथ माळी,मोहन फौजी,लक्ष्मण बोढरे,विठोबा आण्णा,विशाल देशमुख, महाजन साहेब,नाना खलाने,भगवान सोनवणे व गावातील आजी माजी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MD TV न्यूज ,धुळे तालुका प्रतिनिधी, दिलीप साळुंखे..