विविध विकास कामांचे राम रघुवंशींच्या हस्ते झाले भूमिपूजन..

0
221

नंदुरबार : २७/२/२०२३

नंदुरबार तालुक्यातील आराळे येथे एम. आर. जी. एस योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष .राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं .

aarale news ndb
विकासकामांचं आराळे येथे भूमिपूजन करतांना बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी


गावात एमआरजीएस अंतर्गत विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं .
. गावातील महादेव मंदिर परिसरात, गावातील चौकात व नवीन आदिवासी वसाहतीत प्रत्येकी दहा लाखाची अशी एकूण तीस लाख रुपयाची पेवर ब्लॉकची कामे बाळासाहेबांची शिवसेनाचे जेष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आली.
त्यांच्या मार्गदर्शनाने या विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुमुल डेअरीचे संचालक व निझर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.योगेश दादा राजपूत, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के आण्णा पाटिल, उपस्थित होते.
तसेच या ठिकाणी तालुकाध्यक्ष रविंद्रसिंग गिरासे, विद्यमान सरपंच श्रीमती.योगिता प्रदीपसिंग गिरासे,उपसरपंच नरेंद्रसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मोरे, रमेश वाघ, उपस्थित होते .
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विजयसिंग गिरासे,सामाजिक कार्यकर्ते अनिल गिरासे, प्रदीपसिंग गिरासे, युवराज पाटील, राजपाल गिरासे, मानसिंग भिल, वीरपाल गिरासे, हर्षल गिरासे, प्रणित गिरासे,मंगल भिल, सुनील भिल, रजू नाईक, भाऊराव भील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नारायण ढोडरे
प्रतिनिधी – ग्रामीण नंदुरबार. एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here