…..शिवजन्मोत्सव मंडळांना भेटी देऊन भुजबळांनी केलं अभिवादन

0
124

नाशिक :२०/२/२३

  • शॉर्ट
  • १. छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नाशकात केलं अभिवादन
  • २. मंडळांनी तयार केलेल्या आकर्षक देखाव्यांचे केले कौतुक
  • ३. अन्याया विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच ..-भुजबळ

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नाशिक शहर व परिसरातील शिवजन्मोत्सव मंडळांना भेटी देऊन अभिवादन केलं .

nsk0bhujbalshivjayanti.jpeg.2
01

पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा मंडळ, मालेगांव स्टॅण्ड शिवजन्मोत्सव सोहळा मित्र मंडळ, सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा मंडळ, त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक सकल मराठा समाज शिवजन्मोत्सव सोहळा मंडळ, पवन नगर नवीन नाशिक शिवजन्मोत्सव सोहळा मंडळ, नाशिक रोड शिवजयंती उत्सव मंडळ, हिरावाडी शिवजयंती उत्सव मंडळ, उत्तमनगर शिवजन्मोत्सव मंडळ या विविध मंडळांना भेटी देत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केलं ..

परदेशात देखील महाराजांचा इतिहास लिहिला जातो.मात्र आपलं दुर्दैव कि याच देशात काही जण इतिहास पुसण्याचे काम करतात…नेमकं ऐकू या भुजबळ काय बोललेत..

नाशिक :नाशकात एका मंडळाच्या शिवजयंती सोहळ्यात बोलतांना ना.छगन भुजबळ …

छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावर समाधी महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली. त्यांनी पोवाडा लिहून पहिल्यांदा शिवजयंती उत्सवास सुरुवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या हृदयातील देव आहे. त्यांचा इतिहास विसरला जाऊ नये यासाठी जयंती उत्सव आपण साजरा करतो. सद्या देशात इतिहास पुसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हा इतिहास विसरता कामा नये असे त्यांनी म्हंटल.
यावेळी शिवजन्मोत्सवा निमित्त मंडळांनी तयार केलेल्या आकर्षक देखव्यांबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच कौतुक केलं.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,डॉ. शेफाली भुजबळ,शिवसेना उपनेते सुनील बागुल,शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार,माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधूने, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा,अंबादास खैरे,समाधान जेजुरकर, बाबासाहेब राजवाडे, जीवन रायते, अमित खांडे, योगेश गांगुर्डे, मुकेश शेवाळे, श्रीकृष्ण लवटे, मुकेश शहाणे,अजय बागुल, बाळा दराडे, विक्रम कोठुळे, गौरव गोवर्धने, सचिन गांगुर्डे, वृषाली सोनवणे, बाळासाहेब गिते, विश्राम सोनवणे, कृष्णा काळे, सुनील आहिरे, रामेश्वर साबळे, अमित भामरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी एम.डी. टी. व्ही. न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here