नागपूर : दि.११/०२/२०२३
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत पहिल्या कसोटीत विजय सलामी दिली आहे. यासह मालिकेत आघाडी घेतली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूवर आयसीसीने कारवाई केली आहे.
टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर सीरिजमधील नागपूरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकाबाजूला टीम इंडिया विजयाचं सेलिब्रेशन करत होती. मात्र आयसीसीने या आनंदावर विरजण टाकलं. आयसीसीने टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
नक्की कारवाई का?
रवींद्र जडेजा याने आयसीसीच्या आचरसंहितेचं उल्लंघन केलं. त्यामुळे आयसीसीने नियमांनुसार ही कारवाई केली आहे. त्यानुसार, आता जडेजाला नागपूर कसोटीच्या एकूण मॅच फीच्या 25 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागणार आहे.
आयसीसीकडून रवींद्र जडेजा याच्यावर मोठी कारवाई
व्हायरल व्हीडिओत नक्की काय?
या व्हायरल व्हीडिओत जडेजा ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 46 वी ओव्हर टाकायला आला होता. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. या व्हीडिओत जडेजा बॉलिंग टाकण्याआधी मोहम्मद सिराज याच्याकडे जातो. सिराजच्या हातावर मलमसदृश पदार्थ असतो. तो पदार्थ जडेजा बोटाने घेतो. जडेजा तो पदार्थ ज्या हाताने बॉल टाकतो त्या हातावरील बोटाला लावला. हा पदार्थ चिकट असल्याचं दिसून येतोय.
जडेजाने चिटींग केली की नाही, हा दुसरा मुद्दा. जडेजा बॉलला कुडतरत नसून तो हाताला मलम लावत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंन आहे. मात्र तसं जरी असलं तरी जडेजाने तसं करण्याआधी फिल्ड अंपायर्सना विश्वासात घ्यायला हवं होतं, असंही काही नेटकऱ्याचं मत आहे.
ब्युरो रिपोर्ट,एम डी टी व्ही न्यूज,नागपूर