मुंबई :२४/२/२०२३
दोन्ही शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याबाबत चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास मान्यता दिली असून, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. आता माहिती मिळत आहे,
या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणतात, ‘औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ झाले.
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे कोटी-कोटी आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने करुन दाखविले.’.
मुंबईहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो …