राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्षाची घोषणा ५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे ५ मे रोजी काय निर्णय होतो याकडे महाराष्ट्रासह साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. व
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत अस्वस्थता आहे. पुढचा अध्यक्ष कोण होणार ? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष सुप्रिया सुळे किंवा प्रफुल्ल पटेल असतील, अशी शक्यता व्यक्त होत असून तशी चर्चा सुरु आहे. शरद पवार अध्यक्षपद पुन्हा घेण्यास इच्छुक नसल्याने नवा अध्यक्ष कोण ? याची चर्चा सुरु आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अंदाज लावू नका …!
अंदाज लावू नका, एक दिवस जाऊ द्या, निर्णय आम्हीच तुम्हाला सांगू. आज शरद पवार आले सगळे नेते त्यांना भेटले. मुंबई असताना पवारसाहेब आले नेहमीप्रमाणेच भेट घेतली. आज कोणतीही बैठक नव्हती. कोणताही नेता बैठकीला आला नव्हता. आज बैठक झाली नाही निर्णय झालेला नाही. उलट सुलट बातम्या येत होत्या. पवारसाहेब काल घेतलेला निर्णय परत घेण्याचा विचार केलेला नाही. त्यांनी मनात काय आहे हे स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पक्षात कोणीही नाराज नाही. जयंत पाटील हेही नाराज नाहीत. त्यांच्याशी बोलणे झालेय. ते एका मिटिंगला गेले होते, अशी माहिती पटेल यांनी दिली.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई