BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी

0
295

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व शिवसेना (उबाठा ) गटाचे नेते खा.संजय राऊत यांना जीवे ठार मारण्याची धमकी ट्विटर व फोनवरून देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जेष्ठ नेते खा.शरद पवार यांना ट्विटरवरून तर खा.संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन वरून धमकी देण्यात आली आहे.

यामुळे राष्ट्रवादीसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी मविआने केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरुन एका व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांना या आधीही अशा प्रकारे धमक्या आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र स्वत: माहिती देताना आपल्या व्हॉट्सअॅपवर धमकी आल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांना आलेल्या धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीबद्दल माहिती दिली असल्याचे समजते.

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

शरद पवार यांना एका ट्विटर हँडलवरुन अज्ञात व्यक्तीने धमकी दिली. या धमकीमध्ये ‘…. तुझा दाभोलकर केला जाईल’ अशा स्वरुपाची धमकी दिल्याचे समजते आहे. शरद पवार यांना धमकी येणे दुर्दैवाची बाब आहे. लोकांमध्ये इतका द्वेश येतो कुठून? कोणीतरी एखादा व्यक्ती ट्विटर हँडलवरुन धमकी देतो.

त्यानंतर त्या ट्विटला इतर लोक प्रतिक्रियाही देतात, हा काय प्रकार आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही? काय सुरु आहे हे सगळं? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खा.राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या फोनवर एका व्यक्तीने हिंदीतून धमकी दिल्याचे समोर आले आहे.

‘सकाळची बडबड बंद झाली पाहिजे…’ असे म्हणत तुम्हा दोघांना जीवे ठार मारू अशा धमकीचा कॉल रेकार्ड आमदार सुनील राऊत यांनी पोलिसांना दिल्याचे विविध माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांना देण्यात आलेल्या धमकीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here