बिग ब्रेकिंग : कौटुंबिक शेती वादातून खून,आरोपी फरार ..

0
2777

शहादा /नंदुरबार – २७/७/२३

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथील हि घडलेली घटना आहे.. शेतीच्या वादातून थेट गोळीबार झाला असून यात दोन जणांचा मृत्यु झाला आहे. या गोळीबारात ४ जण जखमी झाल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून कळली आहे. मलगावच्या पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलल्या जात आहे.त्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले ..या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सद्यस्थितीत गावात पूर्ण शांतता आहे. मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावठी पिस्तुल आणि तलवारी कुठून आणल्या? याचा तपास पोलीस करत आहेत. अद्याप कुठल्याही आरोपीला अटक झाली नाही. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

1
2
3
4
5

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
कुटुंब एक,दोन गटात वाद :
मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती असलेल्या मलगाव या गावात एका कुटुंबातील दोन गटात शेतीचा वाद होता. याच शेतीच्या वादातून आज तुफान राडा झाला. या राड्यामध्ये गावठी पिस्तुलाचे 2 राउंड फायर झाले आहेत. यात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अन्य पाच जण जखमी:
मात्र घरगुती वादात थेट गावठी पिस्तुल काढून दोन राऊंड फायर केल्याने गावात एकच खळबळ उडाली. तसेच या वादात तलवारीने देखील वार करण्यात आले आहेत. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.त्यामुळे आरोपींना शोधून काढणे हे तगडे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गावात अशा पद्धतीने गावठी पिस्तूल आलेच कुठून असा प्रश्न निर्माण झालाय तो नागरिकांच्या मनात.. या प्रकरणाचा पोलीस छडा लावतीलच परंतु एका युवकाला आपला या वादातून झालेल्या राड्यात जीव गमवावा लागलाय.
संजय मोहितेंसह जगन ठाकरे,शहादा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here