BIG BREAKING:रात्रीच झाली भेट .. अखेर ठरलं ..

0
3164

दिल्ली /मुंबई -३०/६/२३

Maharashtra Cabinet Expansion Latest News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन आज १ वर्ष होत पूर्ण होत आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन दिल्लीला रवाना झाले..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

एकनाथ शिंदेंपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा दिल्लीला रवाना गेले. विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट सुद्धा घेतली. या भेटीत मंत्र्यांच्या शपथविधीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात?
शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी एम डी टी व्हिला दिली आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युती सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रापाठोपाठ राज्यातही अकार्यक्षम मंत्र्यांना (Cabinet Expansion) डच्चू देऊन त्याजागी नवीन चेहरे देण्यावर युती सरकारचा भर राहणार आहे.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिंदे गटाला केंद्रात किती जागा मिळणार?
महाराष्ट्रात भाजसोबत हातमिळवणी करून सत्तेत आलेल्या शिंदे गटाला मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळात २ जागा मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. यात एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पद असून त्या जागी कोणाची वर्णी लावायची? हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोडण्यात आला आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू होताच, राज्यातील भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी लॉबिंग करण्यास सुरूवात केल्याचं कळतंय. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या आमदाराला संधी मिळणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज ,मुंबई/दिल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here