BIG BREAKING – ‘शिंदे गट राजकीय पक्ष नाही’

0
158

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. शिंदे गटाला मी पक्ष मानत नाही. त्यांनी २२ च काय तर ४८ जागा लढवाव्यात, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावला आहे.

मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. त्यात महाराष्ट्रात १८ होते. आमचा १९ खासदारांचा आकडा कायम राहील. माझ्या वक्तव्यावर कोणी टीका केली तरी मला फरक पडत नाही. मी पक्षाची भूमिका मांडत आहे. १९ जागा कायम राहतील, असंही ते म्हणाले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हा कोंबड्यांचा खुराडा आहे. त्यामुळे ते फडफड करत आहेत. यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल, २२ काय शिंदे गटाला पाच जागाही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी मीडियाशी बोलतांना केला आहे.

मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतता. त्यांना काय पक्ष म्हणायचं का? पक्ष म्हणून काय आहे त्यांच्याकडे? त्यांना काही विचारधारा आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला.मिंधे टोळीने २२ काय ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा १९ खासदारांचा आकडा कायम राहील. मी पक्षाची भूमिका मांडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

संसद भवनाच्या उद्घाटनावरूनही खासदार राऊत यांनी भाजपवर टीका केली. आम्ही केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही. राष्ट्रपती आणि संविधानाच्या सन्मानाचा हा प्रश्न आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांना बोलावलं आहे. या कार्यक्रम पत्रिकेत उपराष्ट्रपतीचं नाव नाही. राष्ट्रपतींनाही निमंत्रण नाही. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रण दिलेलं नाही. हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे का? विरोधकांचा विरोध हा देशाच्या सन्मानासाठीचा आहे. नवीन संसद हा काही प्रायव्हेट कार्यक्रम नाही. तो देशाचा कार्यक्रम आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

बसपा नेत्या मायावती यांनी कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मायावतींना जायचं असेल तर त्यांनी जावं. त्यांना कोणी रोखलं आहे? मायावती विरोधी पक्षात आहे हे कोणी तुम्हाला सांगितलं? मायावती कुणाला पाठिंबा देते हे सर्वांना माहीत आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here