“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …!

0
564

नंदुरबार :- भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरातमध्ये जखौ बंदराजवळ लँडफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कच्छ आणि सौराष्ट्र येथे वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या असलेली चक्रीवादळाच्या दिशा बघता नंदुरबार जिल्ह्याला कुठलाही धोका नाही आहे, माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्र कोळदा (नंदुरबार ) यांनी दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

अरबी समुद्रात निर्माण झालेले “बिपरजॉय” चक्रीवादळाचा प्रवास गुजरातच्या दिशेने झाल्याने गुजरात राज्याला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला याचा फटका बसण्याची भीती नाकरिकांमध्ये दिसून आली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल बिपरजॉय चक्रीवादळाची गुजरातमध्ये जखौ बंदराजवळ लँडफॉल होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कच्छ आणि सौराष्ट्र येथे वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या असलेली चक्रीवादळाच्या दिशा बघता नंदुरबार जिल्ह्याला कुठलाही धोका नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हे सुध्दा वाचा

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून ऊन – सावल्यांचा खेळ सुरु आहे. हवेचा वेग कधी मंदावतो आहे. आज १६ जून रोजी आकाशात ढग दिसून येऊ लागले आहेत. आजचे तापमान किमान २९.४ तर कमाल तापमान ३९.९ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. हवेचा वेग राञी उशिरा थोड्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून २० ते २५ किमी प्रति तास वारे वाहू शकतात. तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसेच कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा यांनी केले आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here