बिपरजॉय : मान्सूनच्या प्रवासात अडथळा … जुलैच्या या तारखेपर्यंत असणार कमी पाऊस !

0
237

मुंबई :  यंदा मान्सून उशिरानं केरळमध्ये दाखल झाला. मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी यावर्षी एक आठवडा उशिर झाला आहे. त्यातच आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली असून, जसा जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा-तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी म्हटलं होतं.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पुढील चार आठवड्यात देशात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो. पुढील चार आठवडे म्हणजेच ६ जुलैपर्यंत देशभरात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज स्काटमेट कडून वर्तवण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

दरम्यान दुसरीकडे अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी १० ते १४ मीटर उंच लाटा उसळतील तर २५ सेंटीमीटरहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिपरजॉयमुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून कच्छ, द्वारका आणि जामनगर जिल्ह्याला याचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलीय.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here