तळोदा -4/6/23
आदिवासी बांधवांसाठी क्रांतिवीर तंट्या मामा भिल हे जननायक म्हणून ओळखले जातात
14 येथील चिनोदा चौफुलीला त्यांचं नाव द्यावं या संदर्भातले निवेदन वारंवार या बिरसा फाइटर संघटने कडनं देण्यात आलं
परंतु निवेदनाची कुठलीही दखल न घेता पुन्हा एकदा या संघटनेने नगरपालिका प्रशासनाला स्मरणपत्र दिले
31 मार्च 2021 नोव्हेंबर 2021 व 22 ऑक्टोबर 2022 असे एकूण तीन वेळा या कार्यालयाला याबाबत निवेदन देण्यात आले होते
ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास सर्वांना सर्वश्रुत आहे
सातपुडा डोंगरातील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला
गरीब लोकांचे आणि आदिवासींचे संरक्षण केले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सातपुडा पट्ट्यात त्यांना प्रेमाने मामा म्हणायचे
म्हणून सदर चिनोदा चौफुलीला तंट्या मामा बिल चौफुली नामकरण करावं ही आग्रही मागणी बिरसा फायटर्स यांनी तळोदा नगरपालिका प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून दिली
प्रशासनाकडून नामकरण होत नसेल तर आम्हाला परवानगी द्यावी आम्ही या चौफुलीचे नामकरण करण्यासाठीचा खर्च उचलू असा इशाराच एक प्रकारे या संघटनेने प्रशासनाला दिलाय
या निवेदनाची योग्य ती दखल प्रशासन आगामी काळात घेईल अशी आशा करूया
या निवेदनावर संघटनेचे महासचिव राजेंद्र पाडवी तालुकाध्यक्ष सुभाष पावरा यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
नितीन गरुड ,तळोदा ग्रामीण प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज, नंदुरबार