तहसीलदारांमार्फत दिले राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन
नंदुरबार -२२/७/२३
मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पार उद्ध्वस्त झाल्याचं आता समोर आलं आहे. कारण गेल्या दोन-अडीच महिण्यांपासून जातीय दंगलीनंतर आता आणखी एक माणुसकीला लाज आणणारी घटना समोर आली आहे. इथं काही महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Manipur hills video of Adivasi women being paraded naked surfaces) मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी हा प्रकार घडला असून याचे व्हिडिओ गुरुवारी आयटीएलएफच्या आंदोलनादरम्यान व्हायरल करण्यात आले. यामध्ये काही पुरुष हे दुसऱ्या आदिवासी समाजातील दोन असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला स्पर्श करत होते, याद्वारे त्यांचा विनयभंग करत असल्याच समोर आलंय .. त्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
विधानसभा पावसाळी अधिवेशन : विविध प्रश्नांवरून सरकारला आमदारांनी घेरले ..
SHAHADA :जैन समाजाने काढला मूकमोर्चा..जैन संतांच्या हत्येचा निषेध ..
या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटण्यास नंतर सुरुवात झाली .. राजकीय पक्षांसह विविध सामाजिक ,विद्यार्थी संघटनांनी यात उडी घेतलीय .. संशयित आरोपींना फाशीच द्या या मागणीचे निवेदन ठिकठिकाणी प्रशासनाला देण्यात आले ..
मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत धिंड काढणा-या जमावातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी व मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.
आदिवासींवर होणारे हे अत्याचार थांबविण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,म्हणून मणिपूर येथील २ आदिवासी महिलांवर अमानवीय कृत्य करणा-या जमावातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी..अन्यथा बिरसा फायटर्स संघटना व संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशाराही बिरसा फायटर्स संघटनेने सरकारला दिला आहे..
निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राणीपूरचे बुकलाल पावरा, उदाम पावरा, धरमसिंग पावरा, किर्तन पावरा
आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण ढोडरे,ग्रामीण प्रतिनिधी ,नंदुरबार ,एम डी टी व्ही न्यूज ..