अक्कलकुवा /नंदुरबार -१८/४/२३
आय.सी.टी.सी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा मार्फत ओळख कार्यक्रम आश्रम शाळेत आयोजित करण्यात आला
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करून त्यांना त्याचा रक्तगट विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सिकलसेल आजारा विषयी ,रक्तगट विषयी व अक्कलकुवा तालुक्यातील होणाऱ्या रस्ते अपघाता विषयी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त पहिला रक्तगट तपासणी कार्यक्रम मांडवा आश्रम शाळा येथे घेण्यात आला सदरील शिबिरात एकूण ३१२ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
दुसरा रक्तगट तपासणी शिबिर आश्रम शाळा मोरंबा येथे घेण्यात आले ..
सदरील शिबिरात एकूण ३७५ विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणी करण्यात आले .
तिसरे रक्तगट तपासणी शिबिर कार्यक्रम आश्रम शाळा अलिविहिर येथे घेण्यात आले सदरील शिबिरात एकूण ४०७ विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणी करण्यात आली. सदरील शिबिरात एकूण १०९४ आदिवासी समाजातील विद्यार्थांची रक्तगट तपासणी करून एक नवी ओळख देण्याचे काम आय.सी.टी.सी समुपदेशक महेश कुवर यांनी केले .. ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या प्रशिक्षित विद्यार्थिनी च्या मदतीने सदरील शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले.



आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदरील कार्यक्रमा साठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथील डॉ.शिवाजी पाटील,वैद्यकीय अधीक्षक,डॉ.संतोष परमार वैद्यकीय अधीक्षक कोकणी मीनाक्षी विक्रम, यांचे सहकार्य लाभले ..
मुख्याध्यापक मांडवा आश्रम शाळा ,सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, संतोष चौधरी मुख्याध्यापक, साईनाथ अधीक्षक, एम.जे.गावित अध्यक्षिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आश्रम शाळा मोरंबा,नितीन कलाल अधीक्षक व सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी आश्रम शाळा आलिविहिर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ..
त्यासाठी त्या सर्वांचे आयसीडीसी समुदेशक महेश कुवर यांनी आभार मानले.
शुभम भंसाली ,अक्कलकूवा तालुका प्रतिनिधि,एम डी टी व्ही न्यूज