बोगस दिव्यांग शिक्षकांची जे.जे.रुग्णालयात तपासणी करावी

0
208

प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

नंदुरबार :- प्राथमिक शिक्षक सर्वसाधारण बदल्या अंतर्गत संवर्ग एक मधून लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या बोगस दिव्यांग आजार प्रमाणपत्राची पुनर्र पडताळणी करण्यात यावी. यात बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी अथवा पदोन्नती घेतली असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ गावित यांनी केले आहे.

3380a463 0ed4 4630 8182 2116488c5648

प्रहारचे नेते तथा माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्यासह नंदुरबारचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे, सचिव मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मंत्रालय मुंबई, आयुक्त अपंग संचालनालय पुणे आदींना निवेदन पाठविण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवेच्या शर्ती अधिनियम १९६७ अन्वये जिल्हा परिषदेच्या सेवेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती होते. नियुक्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सेवा शर्तीचे पालन करणे जिल्हा परिषद सेवा शिस्त अपिल नियम १९६४ अन्वये निर्धारित केले आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील बोगस अपंग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर खरेपणाचा आदर्श ठेवायचा ते गुरुजी खोटी प्रमाणपत्रे सादर करताना पकडले गेल्याने जिल्ह्यात खळबळजनक वातावरण आहे.

जिल्ह्यात एकाच ठिकाणी जास्त कालावधी झालेल्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रशासकीय बदली झाल्यास बदली दूर होणार अशी भीती शिक्षकांमध्ये होती. नियमानुसार अपंग असलेल्या कर्मचाऱ्यांना या बदलीतून सवलत असते. याचाच फायदा घेऊन जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बदली टाळण्यासाठी अपंग असल्याची प्रमाणपत्रे शिक्षण विभागात सादर केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

बनावट प्रमाणपत्रे मिळवून देणाऱ्या दलालांची मोठी साखळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची चर्चा आहे. मात्र, अपंग प्रमाणपत्र सादर करणा-यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने संबंधित शिक्षकांची जे.जे. हॉस्पिटल येथे दिव्यांग शिक्षकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीसा देवून तपासणी करण्यात यावी. बोगस आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन शासकीय सेवेतून बडतर्फची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार २८ एप्रिल रोजी प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यामध्ये अनेक शिक्षक संवर्ग एक दिव्यांग व दुर्ग दुर्धर आजारा असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. आजार दिव्यांगत्व आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्राची पुनर्र तपासणी जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात यावी. शिक्षक बोगस निघाल्यास त्या शिक्षकांवर प्रशासकीय कार्यवाही करून सेवेतून बडतर्फ करावे.

  • गोपाल गावीत, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना, नंदुरबार.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here