शिंदखेडा -१३/६/२३
शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम समिती प्रभाग समिती व प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची निवड पंधरा दिवसात पूर्ण करून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटनेची ताकद वाढवा असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री प्रदीप राव यांनी केलं
. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
आज आशापुरी देवी पाटण येथील सभागृहात सिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्राम समिती स्थापना प्रभाग समिती स्थापना व प्रत्येक बुथवर दहा कार्यकर्त्यांची त्वरित निवड करणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तात्काळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात यावी.
याकरिता बैठक आयोजित करण्यात आली .
यावेळी दिलीप साळुंखे, प्रमोद सिसोदे ,सुनील चौधरी ,दीपक अहिरे यांनी पक्ष संघटना वाढीसाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा असे आवाहन केले,
प्रा. सुरेश देसले म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर यांचे नावाचा जर पक्ष विचार करणार असेल पक्षाने त्यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यास त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध राहू.
धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यावेळी म्हणाले की तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आगामी काळात पक्ष संघटना बांधण्यासाठी आपलं योगदान पक्षाच्या बाजूने उभं करावं असे मत यांनी व्यक्त केले.
हे सुद्धा वाचा ..
बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
प्रस्ताविक प्रा. विशाल पवार यांनी केले
यावेळी मंचावर पांडुरंग माळी ,दोंडाईचा शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसंत कोळी, प्रदेश युवक राहुल माणिक, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे , गटनेते दीपक देसले, शहराध्यक्ष दिनेश माळी, जिल्हा बँकेचे संच माजी संचालक प्रकाश पाटील ,माजी संचालक शरद पाटील ,माजी उपसभापती श्यामकांत पाटील, भानुदास पाटील, माजी सभापती पुरुषोत्तम पाटील, माधव बडगुजर, हेमराज पाटील, आबा मुंडे शिवाजी पाटील भानुदास पाटील , लोटन माळी, भाईदास निळे ,भगत धनगर , पंढरीनाथ सिसोदे महेंद्र भिल पंजाब पवार गोपाल देवकर, भागवत परदेशी, भाऊसाहेब शिवाजी पाटील विशाल साळुंखे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वीरेंद्र झालसे, माजी नगरसेवक अशोक सोनवणे पाटील धनराज देसले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
एम.डी.टिव्ही न्युज प्रतिनिधी , यादवराव सावंत ,शिंदखेडा ..