बापाच्या डोळ्यांसमोर दोन्ही मुलांनी सोडला प्राण

0
293

सोमावलनजीक अपघातात दोघा भावासह एकाचा मृत्यू
मातृदिनी दोन्ही मुलांवर अंत्यसंसार करण्याची हृदय पिळवून टाकणारी घटना
सातपुड्यात शोककळा ; अनेक घरामध्ये पेटल्या नाहीत चुली
म्हातारपणाचा आधार गेलेल्या वृद्ध आई वडिलांचा आक्रोश

तळोदा : – मातृदिनानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव सुरु असतांना व जन्मदात्या आईचा थोरवी गायली जात असताना आपल्या दोन्ही मुलांवर अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवून टाकणारी दुर्दैवी घटना कुकूरमुंडा तालुक्यातील मोरंबा खालचापाडा येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसर निशब्ध होत शोकसागरात बुडाला. अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. दोन्ही मुलांच्या दुर्दैवी निधनाने म्हातारपणीचा आधार गेल्याने हंबरडा फोडणाऱ्या वृद्ध आई-वडिलांचा आक्रोशाने सारा गाव व परिसरातील लोकांच्या डोळ्यांना धारी लागल्या होत्या.
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे विवाह सोहळ्यासाठी दुचाकीने जात असतांना समोरुन येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू झाला. तसेच समोरील दुचाकीवरील दुचाकीस्वारदेखील ठार झाला. वडीलांसमोरच दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांनी एकच आक्रोश केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुकरमूंडा तालुक्यातील मोरंबा खालचापाडा येथील पंकज दिलवर वळवी व राहूल दिलवर वळवी हे दोघे भाऊ चिनोदा येथे मित्राच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर त्यांचे वडील व इतर नातेवाईक देखील होते. दरम्यान, अक्कलकुवा-तळोदा रस्त्यावरील सोमावल गावाजवळून जात असतांना दि.१३ रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास समोरुन येणारी दुचाकी (क्र.एम.एच.१५ एफएळ ४६२४) वरील चालक बादल रविंद्र पाडवी याने पंकज वळवी याच्या दुचाकीला (क्र.जी.जे.०५ एचएच २८९५) धडक दिली. या अपघातात पंकज वळवी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. तर राहूल दिलवर वळवी व बादल रविंद्र पाडवी हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, अपघात घडल्यानंतर काही अंतरावर असलेले पंकज व राहूल यांचे वडील दिलवर वळवी व योगेश ठाकरे हे देखील घटनास्थळी पोहचले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. तसेच कलावती फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी अपघात घडल्यानंतर दिलवर वळवी यांच्यासमोरच एका मुलाचा जीव गेला होता तर दुसरा मृत्यूशी झूंज देत होता. त्यामुळे त्यांचे अवसान गळाले. होते. घटनास्थळी मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता. जखमी राहूल वळवी व बादल पाडवी यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या घटनेने सातपुडा परिसर सुन्न झाला असून दोघा भावांच्या मृत्यूसह बादल पाडवी याचाही मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल शोकाकूल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी योगेश अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन मयत बादल रविंद्र पाडवी याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here