BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’

0
598

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केलं आहे. “मीही क्रांतिकारक निर्णय घेणार मात्र, त्याबाबत आता सांगणार नाही,” असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत…दौलतराव श्रीपतराव देसाई’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलताना त्यांनी हे सूचक विधान केले आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या १६ आमदारांचं खरोखरंच निलंबन होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान याच संदर्भात अप्रत्यक्षरित्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीच्या हालचालींना आता वेग आला आहे. विधिमंडळानं निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे. त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सूत्रानी दिली आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

हे सुध्दा वाचा:

GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवं तर अध्यक्षांना २-३ महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील असं म्हटलं होतं.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष?

शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेले ते आमदार पात्र की, अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. आता राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णयाबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आता नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुध्दा वाचा:

BREAKING… १६ आमदार अपात्रता प्रकरण ; ‘मोठा निर्णय’ – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here