BREAKING… ‘आदिपुरुष’ वर बंदी… नरेंद्र मोदी यांचा निर्णय ?

0
431

‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमावर वेगवेगळ्या कारणाने टीका होत आहे. मोठ्या प्रमाणात या सिनेमाला विरोध होत आहे. आता ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (All Indian Cine Workers Association) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहित सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘हे आमचं रामायण नाही’, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. तर राम मंदिराचे मुख्य पुजारी यांच्यासह देशातील एका भाजपा नेत्याच्या मुलाने या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. तर सिनेमा रिलीज झाल्याने नेपाळमध्ये चाहत्यांनी प्रचंड राडा केला आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV N

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित ‘आदिपुरुष’ सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होता कामा नये, असेही आदेश दिले आहेत. असोसिएशनने ‘आदिपुरुष’ सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर आणि यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सिनेमाचं कथानक, पटकथा आणि संवाद हे राम आणि हनुमान यांच्या प्रतिमेची बदनामी करत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा हिंदू आणि सनातनी धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे”. भारतीयांसाठी प्रभू राम हे देव आहेत. या सिनेमातला रावण हा एखाद्या खेळातल्या राक्षसासारखा वाटतो. ‘आदिपुरुष’ सिनेमातील संवादांनी देशातील आणि जगभरातील प्रत्येक भारतीयाला दुखावलं आहे. आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात या सिनेमाच्या ओटीटी रिलीजवरदेखील बंदी घालण्याचे आदेश दिले असल्याचे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (All Indian Cine Workers Association) म्हटले आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV N

‘आदिपुरुष’ सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut), लेखक मनोज मुंतशीर शुक्ला (Manoj Muntasir) आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मंडळींनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. ‘आदिपुरुष’ सिनेमात प्रभास, कृती सेनन आणि सैफअली खान अशा लज्जास्पद सिनेमाचा भाग नसायला हवे होते. ‘आदिपुरुष’ हा राम आणि रामायणावरील श्रद्धेचा भाग असायला हवा, असेही पत्रात म्हटले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमावर वेगवेगळ्या कारणाने टीका होत असतांना आता देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिनेमावर बंदी घालण्याची मागणी वाढू लागली आहे. नेपाळमध्ये विरोध असताना सिनेमा प्रदर्शित केल्याने चाहत्यांनी राडा केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. तर राम मंदिराचे मुख्य पुजाऱ्यांनी देखील सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here