BREAKING:अजित पवार मुख्यमंत्री…

0
397

मुंबई-15/7/23

अजित पवार काही आमदारांसह शिंदे भाजप सरकार मध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर रविवारी खरी ठरली होती.. अजित पवारांसह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.. नंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या सगळ्या घडामोडींवर टीकास्त्र सोडलं आहे.. तसेच नजीकच्या काळात एकनाथ शिंदे अपात्र ठरतील आणि अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा मोठा खळबजनक दावा संजय राऊत यांनी केलाय..
एकनाथ शिंदे सह त्यांचे अन्य आमदार अपात्र ठरल्यानंतर महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार.. आणि तो असणार अजितदादांच्या रूपाने.. असा दावा माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
अजित पवार मुख्यमंत्री होणार तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार :
लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल एकनाथ शिंदे यांना हटवले जाईल.. शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरतील.. यामुळे या घाईगडबडीत अजित पवारांना भाजपने सोबत घेतलं आहे.. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी आयाराम गयाराम असे राजकारण सुरू केले आहे.. हे सगळे राजकारण सीबीआय इन्कम टॅक्स आणि ईडीच्या अडून खेळले जात आहे आमच्या हातात या संस्था द्या आम्हीही राज्याची आणि देशाचे राजकारण बदलून दाखव असा इशारा संजय राऊत यांनी दिला.. संजय राऊत यांच्या अशा विविध विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे…
एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here