पणजी/ गोवा :23/6/23
मडगाववासियांना सध्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मडगाव बस स्थानकातील इलेक्ट्रिक बसचालकांनी बंड पुकारले आहे. पगार वाढ व्हावी यासाठी चालकांनी बस बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
कदंबचे हे जवळपास 140 कंत्राटी चालक असून बसचालकांच्या मते त्यांच्या पगारात वाढ व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरमहा 25 हजार मानधन हातात मिळाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात एकूण 51 बसेस बंद केल्या आहेत.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… |
यामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण कदंब बसने प्रवास करणारा खूप मोठा प्रवासीवर्ग राज्यभरात आहे. एकाएकी 51 बसेस बंद करण्यात आल्याने वाहतुकीवर याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एम डी टीव्ही न्यूज ब्युरो ,पणजी