BREAKING – सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा..!

0
275

बीड : बीडमधील ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा होणार असून त्यापूर्वीच एका मोठया वादाला तोंड फुटले आहे. आगामी सभा सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यातील वादाने सध्या राज्याच्या राजकारणाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जिल्हाप्रमुख असलेले आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामुळे आप्पासाहेब जाधव यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी हा दावा फेटाळुन लावला असून ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महाप्रबोधन यात्रेनिमित्त बीडमध्ये आज ठाकरे गटाची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर काल सुषमा अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे सभास्थळाची पाहणी करत होते. यावेळी सुषमा आधारे व आप्पासाहेब जाधव यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप करून त्यानंतर अंधारे यांना दोन चापट लगावल्याचा दावा केला आहे. तसा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून जाधव यांनी उपनेत्या अंधारे यांना मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करीत पक्षाने जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

आप्पासाहेब यांच्या दाव्यानंतर सुषमा अंधारे यांनी रात्रीच ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत एक फेसबुक लाईव्ह करत आप्पासाहेब जाधव यांचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी मला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. पण मी सुखरुप आहे. मला मारहाण करण्यात आलेली नाही.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आम्ही गुरुवारी महाप्रबोधन यात्रा होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत होते. त्यावेळी बाहेर आप्पासाहेब जाधवांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. एका माणसाला काहीतरी काम सांगत होते. ते त्याला काहीतरी सूचना देत होते. मात्र, त्यांची भाषा उर्मटपणाची आणि एकेरी होती. त्या माणसाला आप्पासाहेब जाधव जिल्हाप्रमुख असल्याचे माहिती नव्हते. त्याला आप्पासाहेब जाधव यांनी वापरलेली भाषा सहन झाली नाही. यातून वाद वाढला. हे सगळे भांडण सुरु असल्याचे समजल्यानंतर मी इतर पदाधिकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आप्पासाहेब जाधव निघून गेले होते. यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर संतापले. पण आपली सभा आहे, महाप्रबोधन यात्रा पार पडू दे, त्यानंतर शांतपणे या सगळ्याचा विचार करू, असे सांगत मी वरेकर यांनी समजूत काढल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here