ब्रेकिंग :नाशिक शासकीय रुग्णालयातील ” हा ” धक्कादायक प्रकार उघडकीस ,म.अं.नि.स.ने फोडली वाचा ..

0
519

नाशिक -५/५/२३

महाराष्ट्र अंनिसचे नाशिक येथील कार्यकर्ते- पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे हा शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे ..
शासकीय रुग्णालयातील केस पेपरवर जातीचा उल्लेख असलेला रकाना तातडीने काढून टाकण्याबाबत मा.आरोग्य मंत्री ,
महाराष्ट्र राज्य ,मंत्रालय, मुंबई. यांना निवेदन पाठवण्यात आलंय ..

कृष्णा चांदगुडे,राज्य कार्यवाह,महाराष्ट्र अंनिस, नाशिक
civilnsk
2

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्याचा आशय असा –
आपल्या खात्याच्या म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीने लोकसेवेत समर्पित असलेल्या शासकीय दवाखान्यांमधून उपचारासाठी रूग्ण गेला असता त्याला प्रथम केस पेपर काढावा लागतो.
या केस पेपर मध्ये रुग्णाला स्वतःबद्दलची माहिती भरावी लागते.
मात्र आता ह्या केस पेपरवर रुग्णाने त्याच्या जातीचा उल्लेख करावा ,यासाठी एक कॉलम असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत अंनिसच्या कार्यकर्त्यांना आढळून आलेले आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका शासकीय दवाखान्यात एका रुग्णाला त्याची ” जात ” लिहिल्या नंतरच त्याच्यावर पुढील उपचार करण्यात आले असल्याचे समजले आहे.
याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी यासंबंधी अतिशय अतार्किक,अजब व धक्कादायक खुलासा केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांचे म्हणणे असे की, काही विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये विशिष्ट आजार असतात.त्यावर उपचार करण्यासाठी हा कॉलम असून, शासनाकडूनच हा फॉरमॅट आला आहे.
म्हणजेच जातभेदाला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार आपल्या आरोग्य खात्याकडूनच म्हणजे शासनाकडूनच होतो आहे की काय, अशी दाट शंका आम्हाला वाटते आहे .
म्हणून आम्ही आपणास नम्रपणे निवेदन करतो की, रुग्णाला देण्यात येणाऱ्या केस पेपरवर जातीचा उल्लेख दर्शविणारा कॉलम तातडीने काढून टाकावा.
कोणत्याही रुग्णावर त्याची जात, धर्म ,लिंग, वंश पाहून उपचार केले जाऊ नयेत.
असे घडत असेल तर ती सरळ सरळ भारतीय नागरिकांच्या समानतेच्या हक्काची पायमल्ली आहे.
कृपया याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी अशी विनंती निवेदनांतून डॉ. ठकसेन गोराणे, राज्य प्रधान सचिव,कृष्णा चांदगुडे,
राज्य कार्यवाह,नितीन बागुल,जिल्हा प्रधान सचिव,महेंद्र दातरंगे जिल्हा बुवाबाजी विरुद्ध संघर्ष सचिव.यांनी केलीय ..
तेजस पुराणिक ,एम डी टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here