BREAKING NEWS… १८ आमदार परत येणार ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

0
317

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असून आजही ४ आमदारांनी मला संपर्क केल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना सत्तेत बसवलं आहे, अजित पवार यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडून गेलो आहे, असं शिंदे गटातील आमदार म्हणत होते पण त्यांचा ढोंगीपणा उघड झाला असंही राऊतांनी म्हटलं आहे.’शिंदे गटातील आमदारांनी मला संपर्क केला’

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. यातील ४ आमदारांनी मला आजच संपर्क केला, असा दावाही संजय राऊत यांनी केला. अजित पवारांच्या येण्यामुळे वाढ झाली आहे. आमच्या पुन्हा विचार करा असं म्हणत शिंदे गटातील बहुसंख्य आमदार आम्हाला निरोप पाठवत आहेत, असंही राऊत म्हणाले.

✍🏻 एमडी.टीव्ही.न्यूज ब्युरो मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here