BREAKING: राजकीय भूकंप -‘मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो कि ….’

0
330

मुंबई -२२/७/२३

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता बॉम्ब पडेल याचा नेम नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपला गट घेऊन एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले. अवघ्या काही तासांपूर्वी विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार दुपारच्या शपथविधीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मात्र तेव्हापासूनच अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे अंदाज अनेक राजकीय पंडित वर्तवत आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, आज (दि. 22 जुलै) महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्रांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी एक व्हिडिओ ट्विट करून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्यात वळणावर नेऊन ठेवले.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले. (Ajit Pawar Birthday)
मात्र अमोल मिटकरींच्या या कॅप्शनमुळे महाराष्ट्रातील राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता बळावत आहे. (Amol Mitkari News)

हे हि वाचा :

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

BIRSA FIGHTERS: मणिपूर घटनेचे पडसाद:आरोपींना फाशी द्या : बिरसा फायटर्सची मागणी ..

अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच महाराष्ट्राचे राजकारण तापवणारे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. आता या ट्विटवर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे मुंख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्याच्या परिसरात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी देखील अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे भाकित केले असून त्यांनी शिंदे गटातील नेत्यांनी ही गोष्ट लवकरात लवकर स्विकारावी असे म्हणत चिमटा देखील काढला.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here