BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त..

0
2195

नंदुरबार -१०/६/२३

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे कृषी विभागाने छापा टाकून तब्बल दोन लाख चार हजार रुपये किमतीचे अनधिकृत बियाणे जप्त केले. सदर कारवाई आयएएस दबंग अधिकार पुलकित सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभागाच्या पथकाने केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन बियाणे जप्त करण्यात आले आहे. परिक्षाविधीन गट विकास अधिकारी पुलकित सिंग यांचा अक्कलकुवा येथील एक महिन्याचा कार्यकाळ संपत असतांना त्यांनी केलेल्या या कारवाईने अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

68bd8037 35c5 4929 888c 2791ff9793e0

याबाबत कृषी विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील मे.मिराई ऍग्रो एजन्सी या दुकानात अनधिकृत एच.टी.बी टी. कापूस बियाणे वाहतूक, साठवणूक व विक्री होत असल्याबाबत गुप्त माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने मे.मिराई ऍग्रो एजन्सी खापर येथे धाड टाकली.

हे सुध्दा वाचा:

उघड्यावर मांस विक्री प्रकरणी तळोदा येथे एकावर गुन्हा दाखल.. – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ताबडतोब संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करा : भुजबळांची मागणी .. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

सदर दुकानाची तपासणी केली असता दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील सीलबंद तीन पोते बियाणे आढळून आले. सदर बियाणे बाबत दुकानाचे मालक गणेश मनोज मराठे यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. भरारी पथकाने सदर पोते उघडली असता यात दोन लाख चार हजार ४०० रुपये किमतीचे अनधिकृत एचटीबीटी बियाण्याची १४६ पाकिटे आढळून आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर कारवाई अंर्गत भरारी पथकातील मोहीम अधिकारी जे.एस.बोराळे यांच्या खबरीवरून गणेश मनोज मराठे, मुकेश मोहन मराठे (रा. खापर, ता. अक्कलकुवा ) यांच्याविरोधात अनधिकृत कापूस ( एच.टी बी.टी. )वाहतूक, साठवणूक व विक्री बाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई गट विकास अधिकारी पुलकित सिंग ( आयएएस ) यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक तानाजी खर्डे, कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील सदस्य अक्कलकुवा तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, तंत्र अधिकारी विजय मोहिते, कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांच्या पथकाने केली.

हे सुध्दा वाचा:

उघड्यावर मांस विक्री प्रकरणी तळोदा येथे एकावर गुन्हा दाखल.. – MDTV NEWS

BIG BREAKING… मविआ नेते खा.शरद पवार व खा.संजय राऊत यांना धमकी – MDTV NEWS

जावयाचा खून! तिघांना जन्मठेप.. – MDTV NEWS

ताबडतोब संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करा : भुजबळांची मागणी .. – MDTV NEWS

ब्रेकिंग -उद्धव ठाकरेंना शिंदेंचा जबरदस्त झटका .. सेना भवनाला सुरुंग.. – MDTV NEWS

एम डी टी व्ही न्युज ब्यूरो, अक्कलकुवा / नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here