BREAKING:तळोदा न.पा प्रशासन सुस्तावले.. नागरिक धास्तावले..

0
184

तळोदा/14-7-23

मान्सूनपूर्व नालेसफाई करणं हे प्रत्येक नगरपालिकेचे कर्तव्य असतं.. मात्र मान्सून सुरू झाल्यानंतर नालेसफाईच्या कामाला वेग दिला जातो.. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराचा आरोग्य प्रश्न ऐरणीवर आलाय.. तळोदा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीनंतर प्रशासन सुस्त झालं.. मान्सून सुरू होण्यापूर्वी नालेसफाई केली जाते परंतु तळोदा शहरात चित्र भलतच दिसू लागलंय.. नालेसफाईच्या कामाचा पुरता बोजवारा उडालाय.. सध्या गेल्या काही दिवसांपासून तळोदा अक्कलकुवा शहरात संततधार पावसाने नागरिक हैराण झाले असल्याने त्यात भर पडली..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोद्यातील काही भागांमध्ये पाण्याचा निचरा होतोय.. हातोडा रोडवरील बार्लीहट्टी व नेमसुशील शाळेकडील बायपास रस्ता या ठिकाणी येजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते… मान्सूनपूर्व नालेसफाई करण्याचा फार्स आवळण्यात आला आणि कागदी घोडे रंगवण्यात आले.. मात्र वास्तव वेगळंच.. पाण्याचा निचरा न झाल्यास रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.. रोगराई वाढल्यास आर्थिक झळ सामान्य नागरिकांना बसू शकते या विचारानेच परिसरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.. नंदुरबार वरून येणारी वाहने बाजारातून न जाता हा बायपास रस्त्याचा वापर करतात..

8c7dbed6 1185 4cae 80c2 5d8ac3562eca
1
77fa40f3 8b0c 4723 be59 07746d12e964
2


तळोदा शहरातील नामांकित नेमसुशील शाळेचे विद्यार्थी देखील याच रस्त्याने ये-जा करीत असताना पाण्यातून वाट काढत अडचणींचा सामना करत शिक्षणासाठी धाव घेतात.. तळोदा नगरपालिकेकडे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.. एकीकडे सुविधा केल्याचा कांगावा पालिकेकडून केला जात असला तरी पाणी रस्त्यांवरील सखोल भागात आणि गल्ल्या मध्ये घुसते तरी कसे ? हा प्रश्न निर्माण झालाय.. मुख्याधिकारी सपना वसावे यांची बढती झाल्याने त्यांची बदली करण्यात आली.. त्यामुळे मुख्याधिकारी नवीन येईपर्यंत नगरपालिका प्रशासन आहे रामभरोसे.. अखेर न्याय आणि दाद मागण्यासाठी कोणाचा दरवाजा ठोठवावा हा प्रश्न सध्या तळोद्यातील नागरिकांसमोर पडलाय.. मान्सून सुरू होण्यापूर्वी जर योग्य त्या उपाययोजना केल्या असत्या तर तळोदा शहरातील नागरिकांना या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली नसती.. मात्र म्हणतात ना प्रशासन सुस्तावले आणि नागरिक धास्तावले ते खरेच.. आगामी काळात पुढे होणाऱ्या जोरदार मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तळोदा शहरातील लोकांच्या समस्या नगरपालिका प्रशासनाने त्वरित सोडवाव्यात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..
नितीन गरुड, तळोदा ग्रामीण प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here